अंतरवाली सराटी ः मराठा आरक्षणाच्या आंदोलनात मराठा नेतेच फूट पडत असल्याचा गंभीर आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. या नेत्यावर थेट निशाणा साधत त्यांना इशाराही दिला आहे. त्यामुळे ते दोन मराठा नेते कोण, याची चर्चा मराठा आंदोलकांमध्ये सुरू झाली आहे.
मराठा आरक्षणाच्या बाबतीत शासन उदासीन भूमिका घेत आहे. समाजासाठी दहा टक्के आरक्षण न मागताही दिला आहे. सगेसोयरे संदर्भातील कायदा करण्याची भूमिका शासनाने दुर्लक्षित केल्याने आंदोलन पुढे सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी राज्यभरात आंदोलन होत आहे. दरम्यान मराठा आंदोलनाच्या या सर्व प्रक्रियेला मराठा समाजातील नेते फूट पाडत असल्याचा गंभीर आरोप जरंगे पाटील यांनी केला आहे. आंदोलनातील काही असंतुष्ट्यांना फुस लावली जात आहे. ज्यांची अवकात नाही. ज्यांनी कधी समाजासाठी काही कर्तुत्व केले नाही. अशा लोकांना जाणीवपूर्वक हाताशी धरले जात आहे. समाजात फूट पाडून गरीब मराठ्यांचे आरक्षणाचे हे आंदोलन मोडीत काढण्याचा डाव शासनातील दोन नेते करीत आहेत. त्यामध्ये आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांचाही त्यांनी नाव न घेता उल्लेख केला आहे. त्यांच्याच आशीर्वादाने काही आंदोलकांना बळ दिले जात आहे. याशिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही काही फुटीर मराठा कार्यकर्त्यांना बळ देऊन गरीब मराठ्यांच्या आंदोलनात फूट पडत आहेत, असाही आरोप जरांगे पाटील यांनी केला आहे. दरम्यान अशा प्रकारांने मराठा समाज तुमच्या पासून कोसो दूर जाईल. तुम्हाला अशा बाबी परवडणाऱ्या नाहीत. यामुळे संबंधित आंदोलकाला आपण आवर घालावा. गरीब मराठ्याच्या तोंडचा घास हिरावून घेऊ नये. असे आव्हानही जरांगे पाटील यांनी आरोग्य मंत्री आणि मुख्यमंत्री यांचे नाव न घेता केले आहे. त्यामुळे आता आरोग्यमंत्री सावंत आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याबाबत काय भूमिका घेतात, काय प्रतिक्रिया देतात. याकडे मराठा आंदोलकांचे लक्ष लागलं आहे.
दोन मराठा नेतेच आंदोलनात फूट पाडण्याचा प्रयत्न करीत आहेत. मनोज जरांगे पाटील यांचा आरोप.
कोण आहेत मराठा आंदोलनात फूट पाडणारे मराठा नेते.......काय म्हणत आहेत जरांगे पाटील....
Older Post
मुख्यमंत्र्यांची दमबाजी
COMMENTS