पंतप्रधानांसमोरच ‘त्या’ भाजप मंत्र्याने महिलेला केला चुकीच्या पद्धतीने स्पर्श ! VIDEO

पंतप्रधानांसमोरच ‘त्या’ भाजप मंत्र्याने महिलेला केला चुकीच्या पद्धतीने स्पर्श ! VIDEO

आगरतळा – त्रिपुरामधील एका मंत्र्याचा व्हिडीओ सध्या देशभर व्हायरल होत आहे. मंत्री मनोज क्रांती देव यांनी त्यांच्याच मंत्रिमंडळातील सहकारी सामाजिक न्याय आणि शिक्षण मंत्री असलेल्या संतना चकमा यांना चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला असल्याचं दिसत आहे. देव यांनी चकमा यांच्या कमरेला हात लावल्याचा आरोप डाव्या पक्षांनी केला आहे. विशेष म्हणजे आगरतळा येथे झालेल्या या सभेत पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री देव आणि अन्य नेते उपस्थित होते.

दरम्यान व्यासपीठावर महिलेला सार्वजनिक ठिकाणी अशाप्रकारे स्पर्श करणे चुकीचे असल्याचे डाव्या पक्षाचे नेते बिजन धर यांनी म्हटले आहे. धर यांनी देव यांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्याची मागणी केली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे विरोधकांकडून भाजपवर जोरदार टीका केली जात आहे.

COMMENTS