तूर खरेदीबाबत देवेंद्र फडणवीस यांचे केंद्राला निवेदन

तूर खरेदीबाबत देवेंद्र फडणवीस यांचे केंद्राला निवेदन

महाराष्ट्रात खरेदीविना पडून असणाऱ्या तुरीवरून चांगलेच वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर तोडगा काढण्यासाठी आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री रामविलास पासवान यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी 22 तारखेपर्यंतची केंद्रांवर आलेली सर्व डाळ खरेदी करावी, असे निवेदन केंद्राला दिले.

नाफेडच्या तूर खरेदी केंद्रावर तूर खरेदी करण्याची शेवटची तरीख 22 एप्रिल होती. त्यामुळे 22 एप्रिलपर्यंत खरेदी केंद्रांवर आलेल्या तुरीची खरेदी करण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्री रामविलास पासवान यांच्याकडे केली आहे.

नाफेडच्या तूर खरेदी केंद्रांवर 22 एप्रिलपर्यंत ज्या शेतकऱयांची तूर आली, ती खरेदी करण्यात यावी, बाहेरून येणा-या तुरीवरील इम्पोट डय़ुटी 10 टक्क्यांवरून 25 टक्क्यांवर करावी आणि तूर खरेदीसाठी ठोस धोरण आखाव, अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी केली. रामविलास पासवान यांच्याशी भेट झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांही ही माहिती दिली. मात्र केंद्र सरकारने मुख्यमंत्र्यांनी केली. रामविलास पासवान यांच्याशी भेट झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांही माहिती दिली. मात्र केंद्र सरकारने मुख्यमंत्र्यांच्या मागणीला कसा प्रतिसाद दिला आहे, ते अद्याप समजू शकलेले नाही.

COMMENTS