रेल्वेमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव यांच्यावर सीबीआयने 2006 मधील हॉटेल निविदेप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयच्या पथकाने आज दिल्ली, पाटणा, रांची, पूरी, गुरुग्राम तसेच लालूप्रसाद यादव आणि आयआरसीटीसीचे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालकांचे निवासस्थान अशा 12 ठिकाणी छापे टाकले आहे. लालूंसह त्यांची पत्नी राबडी देवी, मुलगा तेजस्वी आणि आयआरसीटीसीच्या तत्कालीन व्यवस्थापकीय संचालकांचा आरोपींमध्ये करण्यात आला आहे.
रेल्वेमंत्री असताना 2006 साली लालूप्रसाद यांनी एका खाजगी कंपनीला रेल्वे स्थानकावरील हॉटेल्सची देखरेख करण्याचे कंत्राट बेकायदेशीररित्या दिल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. त्याबदल्यात कंत्राटदाराकडून पाटना येथे मोठा मॉल उभा करण्यासाठी दोन एकर जागा घेतल्याचाही आरोप त्यांच्यावर आहे. या प्रकरणी सीबीआयने आज लालूप्रसाद यांच्या घरावर छापा टाकून चौकशी सुरु केली आहे. याशिवाय रेल्वेचे (IRCTC) माजी व्यवस्थापकीय संचालकांच्या निवासस्थानीही सीबीआयची चौकशी सुरू आहे. दिल्ली, पाटना, पुरी, रांचीसह अन्य 12 ठिकाणी सीबीआयचा तपास सुरू आहे.
COMMENTS