धाराशिव : तीस वर्षे सत्ता उपभोगल्यानंतर जिल्ह्यतील कॉंग्रेसचा दुसरा बडा नेता भाजपच्या गळाला?

धाराशिव : तीस वर्षे सत्ता उपभोगल्यानंतर जिल्ह्यतील कॉंग्रेसचा दुसरा बडा नेता भाजपच्या गळाला?

धाराशिव : तीस वर्षे सत्ता उपभोगल्यानंतर जिल्ह्यतील कॉंग्रेसचा दुसरा बडा नेता भाजपच्या गळाला?

धाराशिव : तीस वर्षे सत्ता उपभोगल्यानंतर जिल्ह्यतील कॉंग्रेसचा दुसरा बडा नेता भाजपच्या गळाला?

वर्षानुवर्ष काँग्रेस पक्षात राहून सत्ता उपभोगल्यानंतर जिल्ह्यतील 1-1 नेते भाजपच्या कळपात सामील होत आहेत. उमरगा तालुक्यातील काँग्रेसचे नेते बसवराज पाटील यांनी अनेक वर्षे आमदार, मंत्रीपद मिळविले. दरम्यान काही दिवसांपूर्वी त्यांचे कुटुंब भाजपच्या गोटात सहभागी झाले. आता दुसरा एक बडा नेता भाजपच्या गोटात स्थिरावत आहे. गेल्या अनेक दिवसापासून माजीमंत्री मधुकरराव चव्हाण यांचे पुत्र सुनील चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. स्वतः मधुकरराव चव्हाण यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत या प्रकरणाला दुजोरा दिला असल्याची चर्चा राजकीय गोटात सुरू झाली आहे.
——
भाजपचा दरवाजा का ठोठावत आहेत

तुळजापूर विधानसभा मतदारसंघात मधुकरराव चव्हाण यांनी गेली पंचवीस वर्षे प्रतिनिधित्व केले आहे. मात्र गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत त्यांना पराभव स्वीकारावा लागला. धाराशिव विधानसभा मतदारसंघातील राणा पाटील यांनी तुळजापूर विधानसभा मतदारसंघात येऊन स्वतःचे वर्चस्व निर्माण केले. वडिलांचा पराभव झाल्यानंतरही सुनील चव्हाण यांनी राणा पाटील यांच्यासोबत जुळून घेतले. तेव्हापासून सुनील चव्हाण भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र काल मधुकरराव यांनी फडणवीस यांची भेट घेतल्याने त्यांच्या प्रवेश प्रकरणाला दुजोरा मिळत आहे. सुनील चव्हाण यांना काही आश्वासने मिळाली असल्याची चर्चा आहे.
—-
मधुकरराव 25 वर्ष सत्तेत असतानाही संस्थात्मक बांधणी करता आली नाही. त्यांनी आता वयाची 80 पार केली आहे. आपल्या पश्चात कुटुंबाचे राजकीय अस्तित्व अबाधित राहावे यासाठी काही तडजोडी करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. बलाढ्य अशा भाजपाला तोंड देणे कठीण असल्याचे संकेत त्यांना मिळाले असावेत. शिवाय खाजगी साखर कारखाना तसेच सहकारी साखर कारखाना बळकटीसाठी आर्थिक बळ गरजेचे आहे. साहजिकच प्रवेशानंतर हे समीकरण जुळून येणार आहे. स्वतः थेट भाजपमध्ये जाण्याचे ऐवजी मुलालाच प्रवेश करणे संयुक्तिक ठरेल, असे पर्याय मांडले जात असावेत. शिवाय
काही आश्वासने त्यांना मिळालेली असू शकतात. याची चर्चा राजकीय गोठात होत आहे. त्यातच आमदार पाटील हे पुन्हा त्यांच्या मूळ धाराशिव विधानसभा मतदारसंघात जाऊन आगामी विधानसभा निवडणूक लढवू शकतात. परिणामी तुळजापूर मतदारसंघात भाजपकडून सुनील चव्हाण यांना उमेदवारी मिळेल. भाजपच्या दोन जागा वाढतील. अशीही राजकीय गणिते मांडली जात आहेत.

COMMENTS