धाराशिव :  जिल्हा काँग्रेसला पदाधिकारी मिळेनात? फादर बॉडीतला पदाधिकारी युवक काँग्रेसमध्ये-

धाराशिव : जिल्हा काँग्रेसला पदाधिकारी मिळेनात? फादर बॉडीतला पदाधिकारी युवक काँग्रेसमध्ये-

धाराशिव : जिल्हा काँग्रेसला पदाधिकारी मिळेनात? फादर बॉडीतला पदाधिकारी युवक काँग्रेसमध्ये-

धाराशिव : जिल्हा काँग्रेसला पदाधिकारी मिळेनात? फादर बॉडीतला पदाधिकारी युवक काँग्रेसमध्ये- उलटा प्रवास

धाराशिव जिल्हा युवक काँग्रेस कमिटीत वादंग सुरू झाल आहे. उमरगा येथील आशिलेष मोरे यांची युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी नुकतीच निवड झाली आहे. त्यांच्या निवडीवरून जिल्ह्यातील युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आक्षेप घेत निवड रद्द करण्याची मागणी युवकचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांच्याकडे केली आहे.
—-
पदांचे वाटप की खिरापत

राहुल गांधी यांनी काँग्रेस पक्षाची सूत्रे हाती घेतल्यानंतर जिल्हाध्यक्ष पदापर्यंत जनतेतून पदाधिकारी निवडण्याची मोहीम सुरू केली होती. ज्यामध्ये पक्षाचे सर्वाधिक सदस्य संख्या करणाऱ्या पदाधिकाऱ्याला वरिष्ठ पद दिलं जाते. दरम्यान धाराशिव जिल्ह्यातील युवक काँग्रेसचे अनेक पदाधिकारी बसवराज पाटील यांच्यासोबत भाजपमध्ये गेल्यानंतर मोठी पोकळी तयार झाली आहे. असे असले तरी युवक काँग्रेस जिल्ह्यात जोमाने कार्यरत आहे. मात्र युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपद देताना वशिलेबाजी झाल्याचा आरोप करीत पदाधिकारी राजीनामा देण्याच्या पवित्रात आहेत.
—-
ज्या कार्यकर्त्यांनी पदाधिकारी म्हणून चांगलं काम केले आहे. पक्ष वाढीसाठी प्रयत्न केले. सभासद संख्या वाढवली, अशा कार्यकर्त्यांना कार्यकारणीत स्थान दिलं जातं. त्यानंतर ज्या सदस्यांनी दुसऱ्या नंबरचे सदस्य केले त्यांना द्वितीय पद दिले जाते. मात्र आशिलेष मोरे यांच्या गळ्यात जिल्हाध्यक्षपदाची माळ टाकण्यात आली आहे. जिल्ह्यात अनेक युवक काँग्रेसची कार्यकर्ते असतानाही केवळ वशिलेबाजींनी हे पद दिले असल्याचा आरोप कार्यकर्ते करीत आहेत.
—–
आशिलेष मोरे फादर बॉडीमध्ये काँग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस म्हणून कार्यरत होते. त्यामुळे त्यांना फादर बॉडीतीलच अन्य पद देणे अपेक्षित होते. असे असताना आता त्यांचा उलटा प्रवास युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदावर येऊन ठेपला आहे. युवक काँग्रेसमध्ये जिल्ह्यात अनेक कार्यकर्ते असताना फादर बॉडीतील कार्यकर्त्याला युवकच्या पदावर बसवल्याने जिल्ह्यात काँग्रेसला पदाधिकारी मिळत नाहीत का असा सवाल विचारला जात आहे? का वशिलेबाजीतून पद दिले आहे? याचीही चर्चा सध्या काँग्रेसच्या गोटात सुरू झाली आहे. यापूर्वीची युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष भाजपमध्ये गेल्यानंतर दुसऱ्या क्रमांकाने मत मिळवलेल्या पदाधिकाऱ्याला अध्यक्षपद देणे अपेक्षित होतं मात्र तसे न करता ज्यांनी कधीही पक्ष कार्यासाठी पुढाकार घेतला नाही. पक्ष वाढीसाठी पुढाकार घेतला नाही. कोणत्याही कार्यक्रमात दिसत नाहीत. अशा फादर बॉडीतील एका कार्यकर्त्याला युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी निवड केल्याने कार्यकर्त्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
——
वरिष्टाच्या आदेश आल्यानंतर आम्हाला काम करावे लागते. यापूर्वीही मी सदस्य संख्या वाढवली आहे. त्यामुळेच मला युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपद दिले आहे.

— अशीलेश मोरे, युवक काँग्रेस, जिल्हाध्यक्ष, धाराशिव.
—–
वर्षांनुवर्षी आम्ही तळागाळात पक्षासाठी काम करतो. मोरे यांची निवड चुकीच्या पद्धतीने झाली आहे. ती रद्द करून नव्याने नवीन युवकांना संधी द्यावी. अशी मागणी आम्ही वरिष्ठांकडे केली आहे.

-शशिकांत निरफळ, अध्यक्ष,
कळंब-धाराशिव विधानसभा.
—-

COMMENTS