सुषमाजी, तुम्ही आमच्या पंतप्रधान असत्या तर….

सुषमाजी, तुम्ही आमच्या पंतप्रधान असत्या तर….

तुम्हाला वाटत असेल की, हे वक्यव्य एखाद्या भारतीय नागरीकांने केले असेल. मात्र नाही, तर हे वक्यव्य चक्क एका पाकिस्तानी महिलेने केले आहे.  भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना उद्देशून हिजाब आसिफ नावाच्या पाकिस्तानी महिलेचे ट्विटरच्या माध्यमातून हे विधान केले आहे. ‘सुषमाजी आपण जर पाकिस्तानच्या पंतप्रधान असता, तर आमचा देश बदलला असता’ असे ट्‌विट या महिलेले केले आहे.

सुषमा स्वराज सोशल मीडीयाच्या माध्यमातून लोकांनी मांडलेल्या समस्यांना तत्काळ सोडवण्याचा प्रयत्न करतात. काही दिवसांपूर्वी अशीच एक घटना समोर आली होती. हिजाब आसिफ या पाकिस्तानी महिलेने तेथील एका नागरिकाला वैद्यकीय उपचारासाठी भारतात यायचे आहे. त्याला मेडीकल व्हिसा मिळत नसल्याने यासाठी तुम्ही मदत करा. अशी विनंती ट्विटरच्या माध्यमातून सुषमा स्वराज यांना केली होती. त्यानंतर स्वराज यांनी इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्तांना या पाक नागरिकांला भारतात येण्यासाठी तत्काळ व्हिसा देण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर या नागरिकाला भारतात येऊन उपचार घेता आले. सुषमाजींच्या तत्परतेमुळे ही महिला त्यांची चाहती झाली. स्वराज यांनी यानंतर असेही आदेश दिले की, पाकिस्तानी नागरिकांना उपचारासाठी भारतात येण्याची परवानगी देता येईल. मात्र व्हिसा अर्जाबरोबर पाकच्या परराष्ट्र मंत्रालयाचे शिफारस पत्रही जोडावे.
सुषमाजींच्या या तत्परतेमुळे हिजाबने एक असेही ट्विट केले आहे. त्यामध्ये ती म्हणते,  ”मी  तुम्हाला काय म्हणू-सुपर वुमन ?.. की परमेश्वर ?.. तुमच्या उदारतेचे वर्णन करण्यासाठी  माझ्याकडे शब्द नाहीत. लव यू मॅम, माझ्या डोळ्यामध्ये अश्रू जमा झाले आहेत. तुमची स्तूती करण्यावाचून मी स्वत:ला रोकू शकत नाही.” हिजाबने पुढे असेही म्हटले आहे की, आम्ही भारताचा तिरस्कार करत नाही. वास्तवात आम्हाला भारताविषयी प्रेम आहे.

 

COMMENTS