धुळे – राज्यात कधीही मध्यावधी निवडणुका लागू शकतील असा बॉम्ब माजी महसूल मंत्री आणि नाराज भाजप नेते एकनाथ खडसे यांनी फोडला आहे. मध्यावधी निवडणुका कधी होतील हे सांगता येणार नाही, मात्र मध्यावधी निवडणुका होतील हे नक्की असं खडसे म्हणाले. मुख्यमंत्र्यांचा हवालाही त्यांनी या विधानासाठी दिला आहे. त्यामुळे राजकीय वर्तूळात खळबळ उडाली आहे. गुजरातमध्ये डिसेंबरमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्याचवेळेस महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका होऊ शकतात असंही खडसे म्हणाले. त्यासाठी भाजपमध्ये जोरदार तयारी सुरू असल्याचंही खडसे यांनी सांगितलं. खडसेंच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मात्र एकच खळबळ उडाली आहे.
COMMENTS