दिल्ली – केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांची प्रकृती ढासळल्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. त्यांना श्वसनाचा त्रास जाणवल्यामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याचं वृत्त आहे. मात्र हॉस्पिटल प्रशासनानं श्वसनाचा त्रास असल्याचं वृत्त खोडून काढलं आहे. त्यांना किडनी स्टोनचा त्रास असल्याचं रुग्णालय प्रशासनाचं म्हणणं आहे. उत्तर प्रदेशातील पीलिभीत या त्यांच्या मतदारसंघाच्या दौ-यावर असताना गांधी यांना त्रास जाणवू लागला. त्यामुळे त्यांना तातडीने पीलिभीतमधील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. त्यांना आता विमानाने तातडीने दिल्लीला हलवण्यात येणार आहे.
COMMENTS