धनंजय सावंत बंडखोरी करणार???

धनंजय सावंत बंडखोरी करणार???

धाराशिव ः धाराशिव लोकसभेसाठी महायुतीकडून अर्चना पाटील यांचे नाव निश्चित झाल्यानंतर शिंदे गटाकडून धनंजय सावंत यांनी बंडाचे निशाण फडकवले आहे. त्यांचे बंड अखेर अपक्ष म्हणून लढविण्यापर्यंत जाणार की ते माघार घेणार. याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
अर्चना पाटील यांनी ऐनवेळी भाजपातून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करीत लोकसभेची उमेदवारी मिळविली आहे. दोन पारंपारिक विरोधकांमध्ये जोरदार लढत होण्याचे संकेत मिळत आहेत. अशातच जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंतही शिवसेनेकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करीत उमेदवारीची मागणी केली आहे. विशेष म्हणजे जागावाटपात मतदारसंघ राष्ट्रवादीला गेल्यानंतरही धनंजय सावंत माघार घेत नसल्याचे चित्र आहे. त्यांनी थेट मुंबईत मुख्यमंत्री
मुख्यमंत्री एकनाश शिंदे यांची भेट घेत मतदारसंघ शिंदे गटाला सोडविण्याची मागणी केली आहे. शिवसेनेचा हा पारंपारिक मतदारसंघ आहे. गेली अनेक वर्षे या मतदारसंघावर शिवसेनेचे आमदार- खासदार निवडून येत आहेत. शिवसेनेतून या जागेवर कोणालाही उमेदवारी द्यावी. आम्ही त्यांचा प्रचार करू. मात्र हा मतदारसंघ सेनेला मिळावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. मात्र मुख्यमंत्र्यांनी त्यांची समजूत काढल्याचे समते. त्यामुळे त्यांचे बंड शमणार असल्याचे संकेत दिसत आहेत.

——-
बंडोबा थंडोबा होणार की……
धनंजय सावंत हे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे आहेत. त्यामुळे पालकमंत्री तानाजी सावंत यांच्या शब्दाबाहेर ते जाणार नाहीत. गेल्या अडीच वर्चाच्या काळात भाजपचे राणाजगजितसिंह पाटील आणि पालकमंत्री सावंत यांच्यात शितयुद्ध सुरू आहे. शिंदे गटाकडे जरी उमेदवारी गेली असती तरी आमदार पाटील यांची साावंतांना मनधरणी करावी लागली असती. आता आमदार पाटील यांच्या कुटुंबात उमेदवारी गेली आहे. त्यामुळे सावंतांची मनधरणी केल्याशिवाय सावंत कुटुंब प्रचारात दिसणार नाही. तर दुसरीकडे भाजपला एकएक खासादार निवडणू आणायचा आहे. त्यासाठी भाजपाचे मनोमिलनाचे प्रयत्न सुरू आहेत. अस असल तरी सावंत गटाला धाराशिव जिल्ह्यात राष्ट्वरादीचे बळ वाढणे परवडणारे नाही. त्यामुळे इकडे आड तिकडे विहिर अशी स्थिती सावंत गटाची अवस्था झाली आहे. परिणामी थेट बंडखोरीही करता येत नाही. अन विरोधही करता येत नाही. त्यामुळे स्वतःचे वजन वाढविण्यासाठी हा प्रकार सुरू असून लवकरच सावंत अर्चना पाटील यांच्या प्रचारात उतरतील, अशी चर्चा राजकीय वर्तूळात सुरू आहे. किमान सभेला हजेरी लावून आम्ही तुमच्या सोबत आहोत, हे सावंत कुटुंबाला दाखवून द्यावे लागणार आहे.
——-
कार्यकर्त्यांचे मनोमिलन कसे होणार
जिल्ह्यात राष्ट्रवादी आणि शिवसेना हे एकमेकांचे पारंपारिक विरोधक आहेत. गेल्या अनेक निवडणुका या दोन्ही पक्षात लढल्या गेल्यात. कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या विरोधात केसेस अंगावर घेतल्या आहेत. न्यायालयात चकरा मारीत आहेत. आता दोन्ही पक्ष एकत्र आले आहेत. त्यामुळे नेत्यांच्या मनोमिलनासाठी कार्यक्रम होतील. मात्र कार्यकर्त्यांचे मनोमिलन कसे होणार हा प्रश्न आहे. खरोखर कार्यकर्त्यांचे मनोमिलन होणार का, वरवरचा दिखावूपणा केला जाणार. अन एकमेकांचे पाय ओढाओढ सुरूच राहणार, याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात जोरात सुरू आहे.

COMMENTS