मुंबई – झोपडपट्टी सुधार योजना अर्थात एसआरए ही योजना भ्रष्टाचाराचे कुरण म्हणून ओळखली जात आहे. सामाजिक कार्यकर्ते संदीप येवले यांनी बिल्डरकडून देण्यात आलेली लाच थेट प्रसिद्धी माध्यमांपुढेच सादर केली. विक्रोळी येथील पार्क साईट परिसरात रेंगाळलेल्या हनुमाननगर एसआरए योजनेतील भ्रष्टाचार उघड करू नये, यासाठी प्रसिद्ध ओंकार बिल्डरने आपल्याला 11 कोटी रुपयांची लाच देऊ केली. तसेच त्याचा पहिला हप्ता एक कोटी रुपये रोख दिला असल्याचा आरोप येवले यांनी केला आहे. यावेळी त्यांनी एका बड्या निवृत्त अधिकाऱ्यावर आणि भाजपच्या दिग्गज नेत्यांवरही यात सहभागी असल्याचा आरोप केला.
एसआरएमधील घोटाळ्याला आणि भ्रष्टाचाराला मुख्यमंत्री जबाबदार आहे. असा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्त नवाब मलिक यांनी केला आहे. एसआरएच्या प्राधिकरण समितीचे अध्यक्ष हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. एसआरएच्या शासन मान्यतेसाठी येणाऱ्या प्रस्तावांवर अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतात. ताडदेवमधील एसआरए प्रकल्पाला अतिरिक्त एफएसआय निर्णय मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेशिवाय झाला आहे का ? मुख्यमंत्र्यांनी याचा खुलासा करावा आणि निर्णय त्यांच्या मान्यतेशिवाय घेतला असेल तर मुख्यमंत्री काय कारवाई करणार, असा सवाल देखील नवाब मलिक यांनी उपस्थित केला आहे.
COMMENTS